⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगाव एमआयडीसीतील खुली जागा स्मशानभूमीसाठी अधिग्रहित

जळगाव एमआयडीसीतील खुली जागा स्मशानभूमीसाठी अधिग्रहित

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२१ । कोविड19 विषाणूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शहरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सेक्टर के मधील ओपन स्पेस-10 (81728) चे क्षेत्र 1500.00 चौमी ही जागा पुढील 6 महिन्यांकरीता अधिग्रहीत करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी आज काढले आहे.

कोविडमुळे मृत्यु झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शहरातील नेरी नाका येथील स्माशनभूमी मनपामार्फत आरक्षित करण्यात आली आहे. याठिकाणी सध्या 24 ओटे आणि गॅसदाहिनी सुरु असून याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. तथापि, तात्पुरत्या स्वरुपात स्मशानभूमी उभारण्यासाठी एमआयडीसीतील ही जागा अधिग्रहीत करण्यात येत आहे. याठिकाणी कोरोना बाधित किंवा संशयित रुग्णांच्या मृत्युनंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने येथे मनपा प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही आदेशात म्हटले आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 321 नुसार प्रेतांची विल्हेवाट लावण्यासाठी ही जागा स्मशानभूमी म्हणून घोषित करण्यात यावी. तसेच या ठिकाणी आवश्यकतेनुसार ओटे तयार करणे आणि शक्य झाल्यास गॅसदाहिनी तयार करण्यात यावी. त्याचप्रमाणे स्मशानभूमीच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तात्पुरत्या स्वरुपात कुंपण तयार करणे, पाण्याची व्यवस्था करणे, जैव कचरा व्यवस्थापन करणे, अग्निरोधक सुरक्षेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच स्मशानभूमीच्या ठिकाणी मृत व्यक्तींच्या नावाची नोंदणी करण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी.

स्मशानभूमीच्या ठिकाणी अंत्यविधीकरीता लागणारे लाकूड (सरण) पुरविण्यासाठी संबंधित पुरवठादार यांना पुरवठा करण्याबाबत निर्देश देण्यात यावेत. तसेच अंत्यविधीकरीता पुरेसे लाकूड (सरण) उपलब्ध करून देणे व लाकूड (सरण) ठेवण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात पत्र्याचे शेड उभारण्यात यावे. तसेच या ठिकाणी शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या कोविड नियमावलीचे पालन करुन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात दिले आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.