
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२२ । शिवसेना नेते एकनाथ शिंदे गेल्या आठवडाभरापासून गुहाटी येथे ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्यासोबत तब्बल 40 शिवसेना आमदार बंडखोरी करून शिंदेवासी झाले आहेत. शिवसेना नेत्यांकडून या बंडखोर आमदारांवर अतिशय कडक भाषेत टीका केली जात आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी याबाबत नरमाईचा सूर आवळला आहे. उद्धव ठाकरे यांनी निवेदन जारी केले असून ‘समोर या चर्चा करु, बसून मार्ग काढून, कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका’ असे आव्हान या बंडखोर आमदारांना केला आहे.

एकनाथ शिंदे गुहाटी येथे ठाण मांडून बसले असतानाच महाराष्ट्रात मात्र संपूर्ण शिवसेना बंडखोर आमदार विरुद्ध रणशिंग फुंकत आहे. खासदार संजय राऊत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तर थेट आमदारांचा बाप काढतानाही पुढे मागे विचार केला नाही, मात्र यामुळे आता बंडखोर आमदार दुखावतील की काय ? याची चिंता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सतावत असल्याने उद्धव ठाकरे यांनी आता नर्माईचा सूर पकडला आहे, महाराष्ट्रात येऊन याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ असे बंडखोरांना आवाहन केले आहे.
यावेळी निवेदनात उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, काही दिवसांपासून गुहाटी येथे अडकून पडलेल्या हात आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यावर काय आघात होत आहे हे मला समजत आहे. आपल्यातील बरेच माझ्याशी संपर्कातही आहात. आपण आजही शिवसेनेत आहात हे मला माहिती आहे. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंब प्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो. अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्या सगळ्यांना आवाहन आहे. आपण या माझ्यासमोर बसा शिवसैनिकांच्या आणि जनतेतील संभ्रम दूर करा. त्यातून नक्की मार्ग निघेल.
उद्धव ठाकरे यांनी या निवेदनातून अतिशय स्पष्ट शब्दात पण प्रेमळ शब्दात आमदारांना पुन्हा येण्याचं आवाहन केलं आहे. त्यांना आता तुम्ही परत या तुम्हाला सन्मान दिला जाईल. असेही म्हटले आहे. समोर आलात बोललात तर मार्ग निघेल असेही सांगितलं आहे. अशावेळी समोर बसून मार्ग निघेल असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांशी बोलताना केले आहे.












