जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२२ । पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याबद्दल बोलताना खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली आहे. या विरोधात मतदार संघातील गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी शिवसैनिकांन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करत निषेध केला. मुर्दाबाद मुर्दाबाद..संजय राऊत मुर्दाबाद, गुलाबभाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है..अशी घोषणाबाजी केली. यासोबतच सावदा येथे देखील शिंदे गटात सामील झालेले मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकानी खासदार संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केले.
यावेळी खासदार संजय राऊत यांचे विरुद्ध घोषणा देखील देण्यात आल्या. या प्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील समर्थक शिवसेना शहर प्रमुख सुरज परदेशी, मनीष भंगाळे, येडु लोखंडे, बंटी लोखंडे, शेख मुश्ताक, शाहरुख तडवी, अश्रफ तडवी, नितीन सपकाळे, दिपक सोनार, नितीन चौधरी , चेतन माळी, गणेश माळी आदी उपस्थित होते.
मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात आज आमदार चंद्रकांत पाटील समर्थकांनी खासदार संजय राऊत यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला काल संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती त्याचा निषेध म्हणून त्यांचा पुतळा जाळण्यात आला तसेच संजय राऊत यांनी शिवसेना संपवली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला तसेच आमदार चंद्रकांत पाटील जे निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा राहील असे समर्थकांनी सांगितले. यावेळी चंद्रकांत मराठे, संतोष माळी, दिपक जोगी, संजय तळेले, मनोज मराठे, अशोक कुंभार, राजु कापसे, दिलीप गायकवाड, अमोल पालवे, रफीक खाटिक, उमेश चव्हाण, सबीर पटेल, जितु पाटील उपस्थित होते.
राज्यात शिवसेनेतील आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात बंड केला आहे. याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. यातच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील बंडखोरीत सहभागी असल्याने शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करताना पाटलाला परत पानटपरी चालवावी लागेल; असे वक्तव्य करत टीका केली आहे. या विरोधात जिल्ह्यात पडसाद उमटत आहेत.
खासदार संजय राऊत यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली. यामुळे शिवसेनेच्या कर्यकत्यांची भावना दुखावली आहे. गुलाबराव पाटील हे तळागाडातील नेता असून सामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचा नेता असा प्रवास त्यांचा आहे. चार वेळेस ते जनतेतून निवडून आले असून त्यांच्यावर टीका करणे चुकीचे आहे. संजय राऊत हे मागच्या दारातून खासदार झाले असल्याची संतप्त भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल आहे. त्यांनी असे वक्तव्य केले ते चुकीचे आहे. याच विरोधात संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केले आहे.