आई रागावली अन् मुलीने उचलले टोकाचे पाऊल

जून 23, 2022 12:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२२२ । आई रागावल्याने दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीने धान्यात टाकण्याचे औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना उघडीस आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना भुसावळ शहरातील सहकार नगरातील तनिष्क अपार्टमेंट मध्ये बुधवारी घडली. अर्पणा सोपान पाटील (वय 16) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

succide

शहरातील सहकार नगरातील तनिष्क अपार्टमेंटमधील रहिवासी अर्पणा पाटील ही गुरूकूल शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. मात्र, मंगळवारी आईने रागावल्यानंतर तिने धान्यात टाकाण्याची औषधाची पावडर पाण्यात मिसळून ते पाणी प्राशन केले व अत्यवस्थ अवस्थेत भुसावळातील डॉ.मानवतकर हॉस्पीटलला उपचारासाठी नेल्यानंतर मध्यरात्री 1.45 वाजता उपचार सुरू असताना तिचा मृत्यू ओढवला.

मृत अर्पणाच्या मृतदेहावर भुसावळातील ट्रामा केअर सेंटरमध्ये बुधवारी सकाळी विच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक अंबादास पाथरवट पुढील तपास करीत आहे. मृत अर्पणा हिची आई डीआरएम कार्यालयात नोकरीला आहे तर वडील ठेकेदार आहे. दरम्यान, रुग्णालयात जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील यांनी जावून माहिती घेतली. अर्पणा ही पाटील यांच्या नात्यात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now