⁠ 
बुधवार, नोव्हेंबर 27, 2024
Home | महाराष्ट्र | मोठी बातमी ! एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवले

मोठी बातमी ! एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज | २१ जून २०२२ । सकाळ पासून नॉट रिचेबल असलेल्या एकनाथ शिंदे यांना गटनेता पदावरून हटवण्यात आले आहे. मुख्यंमत्री यांच्या बैठकीत केवळ १८ आमदार होते.याठकाणी हा निर्णय घेण्यात आला.

त्यांनतर शिंदे यांनी ट्विट करत म्हटले होते कि, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही यामुळे आता शिंदे मागे हटणार नाहीत हे नक्की झाले आहे.

वर्षभरापासून नगरविकासमंत्री एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर नाराज आहेत. त्यांच्या गटातील अनेक आमदार देखील महाविकासआघाडीवर नाराज आहेत.राज्यसभेनंतर कालच विधान परिषदेत देखील भाजपने महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. आपल्या अपयशाची कारणे शोधण्यासाठी शिवसेनेने आज बैठकीचे आयोजन केले होते. दरम्यान, काल सायंकाळपासून नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे त्यांच्या गटातील आमदार नॉटरिचेबल असल्याचे म्हटले जात आहे. याची खबर मातोश्रीवर पोहोचताच उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आमदारांच्या विशेष बैठकीचे आयोजन केले होते मात्र या ठिकाणी स्वतः एकनाथ शिंदेसह आमदार नॉटरिचेबल असल्यामुळे त्या ठिकाणी आली नाहीत यामुळे आता ते कोणचा टोकाचं पाऊल उचलतात का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

ना.एकनाथ शिंदे समर्थक समजले जाणारे जळगावातील एक आमदार देखील नॉट रीचेबल म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांचा एक मोठा गट असून त्यांच्या मुळेच शिवसेनाचा पाया मजबूत असल्याचे नेहमी म्हटले जाते. काल पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीची अतिरिक्त मते मिळवत भाजपने आपला इरादा काय आहे ते स्पष्ट केले होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह