Accident : भरधाव कंटेनरचा दुचाकीला धडक, एक ठार, एक गंभीर

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२२ । भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघात एक जागीच ठार झाला असून एक गंभीर जखमी झाल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील जामदा फाट्याजवळ घडलीय. याबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

aaccident jpg webp

अनिल गोरख चव्हाण (वय २६) रा. सेवानगर तांडा ता. चाळीसगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवार २० जून रोजी अनिल चव्हाण हा त्याचे सासरे सुभाष नथ्थू राठोड यांच्यासोबत धुळे जिल्ह्यातील मोरदड तांडा येथे कामानिमित्त दुचाकी (एमएच १८ बीटी ९०५२) ने गेले होते. काम आटोपून जावई व सासरे पुन्हा सेवानगर तांडा येथे येण्यासाठी दुचाकीने येत असतांना सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील जामदार फाट्याजवळ भरधाव कंटेनर (एनएल ०१, एई ८४६३) ने जोरदार धडक दिली.

यात दुचाकीवर बसलेले सुभाष राठोड हे जागीच ठार झाले तर अनिल चव्हाण गंभीर जखमी झाले आहे. याबबात मेहणुबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार जालमसिंग पाटील करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now