Crime : पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवली

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२२ । चाळीसगाव शहरातील घरी पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना चाळीसगाव शहरात घडलीय. याबाबत महिलेने पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांकडून तपास सुरु आहे.

crime 2022 06 19T130246.736 jpg webp

सुषमा प्रमोद पाटील (वय ३५ रा. हनुमानवाडी चाळीसगाव) ह्या आपल्या घराकडे रस्त्याने पायी जात असताना काळ्या रंगाच्या शाईन मोटरसायकल वर आलेल्या इसमाने बळजबरीने ७० हजार रुपये किमतीची मंगल पोत हिसकावून चोरून नेली. या प्रकरणी सदर महिलेने पोलिसांत तक्रार दिली त्यानुसार भा. कमल ३९४ प्रमाणे अनोळखी भामट्याविरुद्द गुन्हा दाखल झाला आहे. तपास के.के. पाटील करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now