गुन्हे

४६ वर्षीय शेतकरी अज्ञात क्रुझरच्या धडकेत ठार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

      जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२२ । तालुक्यातील पहाण येथील ४६ वर्षीय शेतकऱ्यास भडगाव रोडवरील हाॅटेल भाग्यलक्ष्मी गार्डनजवळ अज्ञात क्रुझरने धडक दिल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि. १८ जुन रोजी घडली. घटनेप्रकरणी अज्ञात क्रुझर चालका विरुध्द पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

     याबाबत सविस्तर वृत्त असे की, पहाण ता. पाचोरा येथील शेतकरी प्रमोद दत्तु पाटील (वय – ४६) हे आज दि. १८ जुन रोजी सकाळी मोटरसायकलने चाळीसगाव येथे बैलजोडी बघण्यासाठी गेले होते. दरम्यान चाळीसगावहुन पाचोऱ्याकडे येत असतांना हाॅटेल भाग्यलक्ष्मी गार्डन समोरील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरुन निघाले असता पाचोऱ्याकडुन भडगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात क्रुझरने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने प्रमोद पाटील हे खालीपडुन त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. प्रमोद पाटील यांना तात्काळ रुग्णवाहिका चालक बबलु मराठे यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी प्रमोद पाटील यांना मृत घोषित केल्यानंतर शवविच्छेदन केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अज्ञात क्रुझर चालका विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मयत प्रमोद पाटील यांचे पाश्चात्य वृद्ध आई, वडिल, पत्नी, एक भाऊ, एक बहिण, एक मुलगा, एक बहिण असा परिवार आहे. अतिशय मनमिळाऊ व हसमुख स्वभावाचे प्रमोद पाटील यांच्या अकस्मात निधनाने पहाण गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

Related Articles

Back to top button