नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मुर्तीकारावर गुन्हा

सप्टेंबर 10, 2021 6:34 PM

 जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२१ । गणेश मुर्तीच्या उंची बाबादच्याअटी व शर्ती शासनातर्फे गणेश भक्तांना देण्यात आले होते. मात्र या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मुर्तीकारावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहरूण परिसरातील पाण्याच्या हौदाजवळ चंद्रकांत प्रकाश वरणे या मुर्तीकाराने सार्वजनिक मंडळाकरीता लागणारे गणेश मुर्ती चार फुटापेक्षा जास्त उंचीच्या तयार करून विक्री करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना९ सप्टेंबर रोजी मिळाली.  रात्री १० वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्यासह पथकातील सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, तुकाराम निंबाळकर, पोहेकॉ रमेश  चौधरी, चेतन सोनवणे, संजय सोनवणे आणि मंदार पाटील यांनी मुर्तीकार चंद्रकांत प्रकाश वरणे (वय-३८) रा. मेहरूण पाण्याच्या हौदाजवळ जळगाव कारवाई केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now