MLC Election : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्यात वाद?

MLC Election मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्यात वाद jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२२ । शिवसेना नेते तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात विधान परिषदेच्या निवडणुकीत काही तास उरले असतानाच मोठा वाद झाले असल्याचे वृत्त समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांना विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेने कोणताही निर्णय घेऊ दिलेल्या नसल्यामुळे हा वाद झाला असल्याचे म्हटले जात आहे. राज्यसभा निवडणुकीवेळी शिवसेनेने मार खाल्ला असल्याने शिवसेनेत धुसफूस आहे अशा बातम्या प्रसारमाध्यमातून समोर येत होत्या. मात्र आता विधान परिषदेच्या दोन दिवस आधी शिंदे व ठाकरे यांच्यात झालेल्या या वादामुळे याचे परिणाम आता थेट विधान परिषद निकालांमध्ये लागतात का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानपरिषदेची हवा सुरू झाली आहे. विधानपरिषद निवडणूक येत्या दोन दिवसात होणार असल्याने मुंबई येथे शिवसेना आमदारांना बोलावून घेतले गेले आहे. शिवसेना आमदारांना मध्ये असलेल्या एकनाथ शिंदे गटातील आमदार हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या खूप अतिशय नाराज आहेत. अशा प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमदारांना मुंबई मध्ये बोलून घेतात. मात्र त्यांना साधी भेटही देत नाहीत. यामुळे पक्षातले काही आमदार खुद्द उद्धव ठाकरे यांच्यावरच नाराज असल्याचे वृत्त समोर येत आहे. याच बरोबर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे शिवसेनेचे नंबर दोनचे नेते व ठाण्याचे पालकमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत कारण तिथून बाजूला ढकलले गेल्या असल्यामुळे त्यांचे समर्थक शिवसेनेत अत्यंत नाराज आहेत असेही समजते.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तले वाद आता काही खाजगी राहिलेले नसून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत केव्हा ना केव्हा हे वाद पोहोचतच असतात. मात्र ऐन विधान परिषदेच्या निवडणुकीआधी हे वाद समोर आल्याने या वादामुळे विधान परिषदेच्या निकालांमध्ये काही फरक पडतो का ? हे पाहणे लक्षणीय ठरणार आहे.विधान परिषदेच्या दहा जागांसाठी 20 जूनला मतदान होणार आहे. गुप्त मतदान होणार असल्यामुळे आमदार कोणाच्या संपर्कात आहेत, याची माहिती गुप्तपणे घेतली जात आहे. शिवसेनेच्या आमदारांना तर माध्यमांशी बोलण्यासही मनाई करण्यात आली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार भाजपच्या गळाला लागू शकतात अशी शक्यता आहे. राज्यसभा निवडणुकीतच काही आमदार क्रॉस व्होटिंग करतील अशी भीती होती. मात्र तसं झालं नाही. आता तेव्हा ज्यांच्यावर संशय होता, ते रडारवर आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now