जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२२ । मुंबई येथील मीरा क्लीन फ्यूएल्स व अमळनेर प्रोडूसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर तालुक्यात जैवइंधन म्हणजेच बायो सीएनजी, पीएनजी व सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प साकारणार आहे. या निमित्त दि. १२ रोजी नांदेड कर सभागृह अमळनेर येथे MCL ग्रामउद्योग (MVP) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर एमसीएल कंपनीचे बीडीए योगेश पवार हे होते.
भविष्यातील इंधन टंचाईवर मात करून देशातच इंधन तयार करण्यासाठी कंपनीतर्फे पावले उचलली जात आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 50 ते 55 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. उत्पादक कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात एक गॅस प्रकल्प कार्यान्वित होत आहे. शेतीतील टाकाऊ पालापाचोळा, कापसाच्या काडीकचरा गवत व हत्ती गवत यापासून घरगुती, औद्योगिक व वाहनांच्या अशा तीन प्रकारच्या गॅस व सेंद्रिय खत या प्रकल्पातून तयार होणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होणार आहे. ग्रामीण भागात प्रत्येक गावात उद्योजक निर्माण करणे प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण स्तरावर प्रत्येक गावात उद्योजक होण्याची संधी निर्माण होणार आहे. मेळाव्यास एमसीएल कंपनीचे सीनियर बीडीए योगेश पवार यांनी कंपनी विषयी सविस्तर माहिती देऊन यशस्वी ग्रामउद्योगजक होण्याचे आवाहन केले. याप्रसंगी अमळनेर प्रोडूसर कंपनी व मधुसुदन क्लीन fuels कंपनीचे संचालक डॉ. मनोज पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिळोदा येथील ग्रामउद्योजक योगेश देशमुख यांनी केले. मेळाव्यास कंपनी संचालक नागराज पाटील, हेमंत पवार ग्राम उद्योगजक भाऊसाहेब पाटील, .अतुल पाटील तसेच चांगल्या संख्येने नवीन ग्राम उद्योगजक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यालयातील कर्मचारी विकास पाटील यांनी चांगले परिश्रम घेतले.