Cyber Crime : ओटीपी विचारून शिक्षकाला २५ हजारात गंडविले

जून 13, 2022 11:28 AM

जळगाव लाईव्ह न्यून । १३ जून २०२२ । क्रेडिट कार्ड इंटरनॅशनल मध्ये कन्वर्ट करण्याचे भासवून ओटीपी विचारून शिक्षकाला २५ हजारात गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पाचोरा पोलिसांत अनोळखी महिला विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

crime 2022 06 13T112709.273 jpg webp

निलेश कवडू क्षीरसागर (वय ३३, रा, सांघवी कॉलनी, पाचोरा ) हे खासगी शिक्षक आहेत. यांना दि. १० रोजी सायंकाळी ५.०० वाजता मो. क्र. ९३६७३६९७८३ या अनोळखी मो. क्रमांकावरून फोन आला. क्रेडिट कार्ड डेमॉस्टीक व इंटरनॅशनल मध्ये कोनवर्ट करण्याचे भासवून ओटीपी विचारून २५ हजाराची फसवणूक केली. या प्रकरणी क्षीरसागर यांनी दि. १२ रोजी पाचोरा पोलिसांत फिर्यादी दिली. त्यानुसार भादवी कलम ४२० प्रमाणे अनोळखी महिला विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोहेकॉ भगवान बडगुजर करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now