खळबळजनक : बोदवड तालुक्यातून एकाच रात्री पाच गुरांची चोरी

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२२ । बोदवड तालुक्यातील जामठी व येवती येथून शनिवारी रात्री पाच गुरांची चोरी झाल्याने खळबळ उडाली. ऐन खरिपाच्या तोंडावर पशुधन चोरटे सक्रिय झाल्याने शेतकरी सावध झाले आहेत.

crime 2022 06 13T094414.156 jpg webp

बोदवड-जामठी मुख्य रस्त्यावरील येवती गावाजवळ सुधारक दिनकर घ्यार यांच्या शेतातील गोठ्यात नेहमीप्रमाणे जनावरे बांधली होती. तेथून दोन गायी, एक बैल व एक गोऱ्हा अशा चारही जनावरांची चोरी झाली. त्यात सुधाकर घ्यार यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. दुसऱ्या घटनेत जामठी येथील गावातील मुख्य रस्त्यावर विठ्ठल हरी महाजन यांच्या घरासमोर बांधलेली एका गायीची चोरी झाली. त्यात महाजन यांचे सुमारे ३० हजारांचे नुकसान झाले. या दोन्ही ही घटना शनिवारी रात्री सुमारे १२.३० वाजेनंतर घडल्या. या प्रकरणी बोदवड पोलिसांत गुन्हा दाखल झाला. हवालदार संतोष चौधरी तपास करत आहे. त्यांनी सतर्कतेचे आवाहन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now