गुन्हे

आत्महत्यांच सत्र सुरूच : अजून एका इसमाने केली आत्महत्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हरिविठ्ठल नगरात एकाने घेतला गळफास

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२२ । जळगाव शहरातील धनगर वाड्यात कौटुंबिक वादातून एकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर अली आहे. यामुळे संपूर्ण हरिविठ्ठल नगर परिसरात खळबळ उडाली आहे. ११ जून रोजी दुपारी १२ ते १२:१५ वाजेच्या दरम्यान घडली आहे.

गणेश आत्माराम बडगुजर (वय- ४८) रा. धनगर वाडा, हरिविठ्ठल नगर जळगाव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गणेश बडगुजर यांच्या घरात गेल्या दोन महिन्यापासून लहान मुलीचे लग्न झाल्यापासून भांडण सुरु होते. यामुळे पत्नी प्रतिभा बडगुजर ह्या भांडणाला कंटाळून मोठ्या मुलीकडे राहत होत्या. तिथून त्या जैन इरिगेशन येथे कामाला जात होत्या. परंतू आज त्या मोठ्या मुलीसोबत घरी आल्या होत्या, गणेश यांच्यासह बहीण व आई घरी होते. यावेळी पुन्हा यासर्वांचे काही भांडण झाले. गल्लीतील लोकांनी दोघ दाम्पत्यास समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्नी व मोठी मुलगी १० वाजता घरातून निघून गेली. यापाठोपाठ मृताची आई व बहिण ही घरातून बाहेर गेले असता गणेश यांनी गळफास लावण्याची घटना घडली. बहिणीला सोडून आल्यानंतर मृताची आईने दार उघडले असता घरात छोट्याशा दोरीने गळफास घेतल्याचा अवस्थेत दिसला, यावेळी मुताची आई यांनी एकच आक्रोश केला हे ऐकून गल्लीतील लोक घटनास्थळी धावले. दरम्यान, अद्यापही मृतदेह घरात पडून आहे. रुग्णवाहिकेला फोन केला असून पोहचली नाही.

Related Articles

Back to top button