नागरिकांनो सावधान! भुसावळ लाखोंचा बनावट खवा जप्त

सप्टेंबर 23, 2023 10:41 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२३ । तुम्हीही बाजारातून खवा घरी आणत असाल तर सावधान. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारात नकली खवा येत असून याच दरम्यान, भुसावळ येथे गुजरात येथील बनावट मावा (खवा) जप्त करण्यात आला. पाेलीसांनी तब्बल पावणेबारा लाखांचा खवा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.

khava jpg webp

सणासुदीच्या काळात बनावट मावा परराज्यातून येत असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पाेलीसांनी तपास सुरु केला. हा मावा गुजरात मधून आणला जात असल्याची खात्री पाेलीसांना पटल्यानंतर संबंधितांवर कारवाईसाठी प्लॅन आखला.

मुक्ताईनगर मलकापूर विदर्भात आमदाबाद येथून ट्रॅव्हल्स मधून 178 बॅग थैलीत ५३४० किलोचा बनावट मावा पाेलीसांनी जप्त केला. त्याची किंमत सुमारे अकरा लाख 874 रुपयांची असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पाेलीसांनी संबंधितावर कारवाई करून अन्न औषध पुरवठा विभागाकडे सुपुर्द केला. पुढील तपास अन्न व औषध प्रशासन करत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now