⁠ 
सोमवार, जुलै 22, 2024

बालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून ; जामनेर तालुक्यातील खळबळजनक घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२४ । राज्यात महिलांसह अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. अशातच आता राज्याला हादरवून सोडणारी एक घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून समोर आली आहे. चॉकलेटचे आमिष दाखवून ३५ वर्षीय व्यक्तीने एका सहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केला. नंतर तिचा खून करून फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी मात्र पसार झाला आहे.

नेमकी काय आहे घटना?
जामनेर तालुक्यातील एका गावात आदिवासी कुटुंब राहतात. मोलमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. सदर बालिकेचे आई-वडील मंगळवारी दुपारी सकाळी मोलमजुरीसाठी बाहेर गेले असताना बालिका घरी एकटीच असल्याचा गैरफायदा संशयित आरोपीने घेतला संशयित आरोपी सुभाष इमाजी भिल (वय 35 राहणार चिंचखेडा) याने सदर व मुलीला घराबाहेर बोलून तुला चॉकलेट घेऊन देतो असे आमिष दाखवले. त्यानंतर गावाच्या बाहेर केळीच्या मळ्यात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिचा निर्घृण खून करून तो पसार झाला आहे . सदर घटना ही मंगळवार दिनांक 11 जून रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.

या धक्कादायक घटनेमुळे जामनेर तालुका हादरला आहे जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार संशय आरोपी सुभाष बिल याचा पोलीस कसून तपास करीत आहे . दरम्यान सदरहू मयत बालिकेचा मृतदेह हा शवविच्छेदन कामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव या ठिकाणी आणण्यात आलेला आहे.