चाळीसगावात कारमधून अवैध गुटख्याची वाहतूक ; ४ लाख ३३ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

ऑक्टोबर 22, 2023 3:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२३ । चाळीसगाव शहर पोलिसांनी अवैधरित्या गुटखा व पानमसालाची वाहतूक करणारी कार पकडली असून एकुण ४ लाख ३३ हजार रुपये किमतीचा मुद्देपाल हस्तगत केला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कारचालक याला अटक केली आहे.

guthaka jpg webp

जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत असून अशातच चाळीसगाव शहरातून अवैधरित्या घोटका वाहतूक व होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान पथकाने कारवाई करत कार क्रमांक एमएच ४३ एक्स ५२५६) ही अडविली. त्यानंतर तिची चौकशी केली असता त्यामध्ये १ लाख ४४ हजार रुपये किमतीचे गुटखा, पान मसाला मिळून आला. दरम्यान पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारचालक याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल टाकले करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now