⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | महाराष्ट्र | 12 वी सायन्स नंतर करीयरचे हे आहेत पर्याय..

12 वी सायन्स नंतर करीयरचे हे आहेत पर्याय..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२२ । बारावी उत्तीर्ण होणे ही मोठी कामगिरी आहे. मात्र, खर्‍या अर्थाने विद्यार्थ्यांची खरी परीक्षा येथूनच सुरू होते. कारण बारावीनंतर योग्य करिअर निवडणे सर्वात कठीण असते. शालेय शिक्षणानंतर विद्यार्थ्यांसाठी करिअरचा योग्य मार्ग निवडणे वाटते तितके सोपे नसते. काही विद्यार्थ्यांना आपल्याला कोणते क्षेत्र निवडायचे आहे हे माहीत असते, तर अनेक विद्यार्थी आपले करिअर कोणत्या क्षेत्रात करायचे याच त्या मनस्थितीत राहतात.

दरम्यान, तुम्ही किंवा तुमच्या कोणी जवळील ओळखीचे विज्ञान शाखेचे विद्यार्थी असाल आणि बारावी करत असाल आणि भविष्याची काळजी करत असाल तर निश्चिंत राहा कारण या लेखात आम्ही तुम्हाला बारावी सायन्सनंतर काय करायचे हे सांगणार आहोत.

महाराष्ट्र बोर्डाचा 12वी परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. 12वी नंतर विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्याने कोणता कोर्स निवडावा, कोणत्या कॉलेजमधून शिकावे. असे अनेक समस्या त्यांच्यापुढे असतात. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक क्षेत्रांचे तसेच महाविद्यालयांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. पालकांचे, मित्रांचे किंवा नातेवाईकांचे मत महत्त्वाचे असले तरी, विद्यार्थ्याने अभ्यासाचे असे क्षेत्र निवडणेही महत्त्वाचे आहे. कारण विद्यार्थ्यांना पुढील करिअर करायचे आहे.

विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी अनेक प्रकारच्या पदवी अभ्यासक्रमांमधून निवड करू शकतात. सायन्स किंवा विज्ञान स्ट्रीम मध्ये एक दोन नव्हे तर बरेच पर्याय आहे. त्यापैकी काही पर्याय आ़़ज आपण जाणून घेणार आहोत.

नॅनोटेक्नोलॉजी-
बारावीनंतर नॅनोटेक्नॉलॉजी उत्तम पर्याय आहे. नॅनोटेक्नोलॉजीमध्ये बीएससी किंवा बीटेक झाल्यानंतर त्याच विषयातील एमएससी किंवा एमटेक करून या क्षेत्रात उत्तम करियर बनवू शकता.

रोबोटिक सायन्स-
रोबोटिक सायन्स खुप मोठे क्षेत्र आहे. या या क्षेत्रात अनेक स्पेशलायझेशन कोर्स छान आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स सिस्टम, कॉम्प्युटर सायन्स मधून पदवी घेतलेले विद्यार्थी या अभ्यासक्रम करु शकतात. यानंतर विद्यार्थ्यांना इस्रोसारख्या नामांकित संस्थेत संशोधन कार्यात नोकरी मिळू शकते.

एन्व्हायर्नमेंटल सायन्स –
पर्यावरणप्रेमी या क्षेत्रात उत्तम करीअर घडवू शकतात. या अंतर्गत इकॉलॉजी, डिझास्टर मॅनेजमेंट, वाईल्डलाईफ मॅनेजमेंट, पोल्युशन कंट्रोल,सारखे विषय शिकवले जातात. यात करीअर म्हणून नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील.

स्पेस सायन्स-
हे विज्ञानाचे खूप विस्तृत क्षेत्र आहे. या अंतर्गत कॉस्मॉलॉजी, स्टेलर सायन्स ,प्लॅनेटरी सायन्स ,ऍस्ट्रॉनॉमी अशी अनेक क्षेत्रे आहेत. याचा अभ्यासक्रम केल्यास बंगलोरमध्ये असलेल्या इस्रो आणि आयआयएससी (IISC)मध्ये नोकरीची उत्तम संधी असते.

डेयरीसायन्स-

दुग्ध क्षेत्रात अतिशय महत्त्वाचे आहे. दुग्ध उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. डेयरी टेक्नॉलॉजी किंवा डेयरी सायन्स अंतर्गत आपण यात शिक्षण घेऊ शकतो. विज्ञान विषयासह बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर स्टुडन्ट ऑल इंडिया आधारावर प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर चार वर्षांच्या पदवीधर डेअरी टेक्नॉलॉजी अभ्यासक्र करु शकतो.

author avatar
Tushar Bhambare