धक्कादायक : ९ वर्षीय चिमुकलीचा विनयभंग

जून 10, 2022 10:49 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२२ । नऊ वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तरूणाला अटक करण्यात आली असून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

crime 2022 06 10T104930.183 jpg webp

शहरातील एका भागात नऊ वर्षीय चिमुकली ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. दि. ९ जून रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास मुलगी घरी एकटी असताना शाहरुख खान करीम खान (वय २५) याने सदर अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा घेत तिचा हात धरून लैंगिक छळ करून विनयभंग केला. हा प्रकार चिमुकलीच्या कुटुंबियांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने रामानंद नगर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार सदर संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now