जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२२ । संजय गांधी योजनेसह विविध योजनेत १,१७८ प्रकरणे मंजूर करण्यात आल्याची माहिती एरंडोल तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी बुधवारी दिली.
संजय गांधी योजनेत १७६ प्रकरणे, श्रावण बाळ योजनेत ७४८ प्रकरणे, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेत १९६ प्रकरणे, विधवा पेन्शन योजनेत ५८ प्रकरणे मंजूर करण्यात आले आहे. तसेच कुटुंब लाभ योजनेत आता पावेतो ८५ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहे. प्रत्येक लाभार्थ्यांना २०,००० रु. अर्थसहाय्य मिळते. या प्रमाणे सर्वाधिक प्रकरणे मंजूर करण्यात आली आहे. सदर विविध योजनाचा लाभार्थ्यांना लाभ मिळाल्यामुळे त्यांना दिलासा मिळालेला आहे.