दुचाकी चलवितांना सेल्फी काढायला गेले अन्… क्षणात होत्याच नव्हतं झालं

जून 7, 2022 11:39 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२२ । जळगाव जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. अशातच दुचाकीवरून प्रवास करताना सेल्फी काढणे मुलांच्या जीवावर बेतले आहे. दुचाकीवरून प्रवास करताना सेल्फीच्या नादात दुचाकी दुभाजकाला जोरात धडकली. यात दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू तर एक तरुण जखमी झाला आहे. ही घटना पाचोरा शहरात घडली असून अयान खान अमीन खान बागवान (वय १४ रा. मुल्लावाडा पाचोरा) आणि उमेर सत्तार बागवान (वय १५ हीदायत नगर रा. चिखली ता. बुलढाणा) अशी मृत मुलांची नावे आहेत. तर साहिल सलिम शेख (रा. अक्सानगर, पाचोरा) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

aaccident jpg webp

काय आहे घटना?
पाचोरा शहरातील स्विमिंग पुलावर पोहण्यासाठी उमेर सत्तार बागवान, अयान खान आमिन खान व साहिल सलिम शेख हे तिघे एम. एच. २० डी. झेड. २९४१ या क्रमांकाच्या दुचाकीवरून गेले. परत येतांना धावत्या दुचाकीवरून तिघांना सेल्फी काढण्याचा मोह झाला. याच दरम्यान दुचाकीस्वाराचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती रस्त्यातील दुभाजकावर जोरात धडकली. या अपघातात उमेर सत्तार बागवान आणि अयान खान अमिन खान या दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर साहिल सलिम शेख हा युवक जखमी झाला. त्याचेवर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पाचोरा पोलिसात याप्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील व पोलिस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र नलवाडे हे करत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now