Jalgaon Temperature : ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला, पण उद्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता

जून 7, 2022 11:13 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२२ । राज्यातील अनेक भागात उष्णतेचा तडाखा पुन्हा वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील तापमानाचा पारा वाढलेले दिसून आला. गेल्या काही दिवसापूर्वी ४० वर आलेला पारा पुन्हा ४२ अंशावर गेला आहे. त्यामुळे दुपारनंतर उकाडा प्रचंड जाणवत आहे. साेमवारी जिल्ह्यात ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद करण्यात आली. दरम्यान, उद्या ८ जूनपासून उष्णतेची तीव्रता कमी होणार असून तापमान चाळिशीच्या खाली उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

tapman 1 jpg webp

देशात मान्सूनचं आगमन झालं असलं तरी यंदा हवा तसा पाऊस झाला नाही. त्यातच अनेक राज्यात उन्हाचा तडाखा पुन्हा वाढला आहे. महाराष्ट्रातील देखील अनेक भागात तापमान वाढले आहे. सध्या विदर्भात उष्णतेने कहर केला आहे. तर उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील तापमान वाढले असून ४० अंशावर आलेलं तापमान सोमवारी ४२ अंशावर गेले आहे. दुपारी १२ नंतर सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने उष्णतेच्या असह्य झळा बसत आहे.

दरम्यान, उष्णतेची तीव्रता येत्या ८ जूनपासून कमी हाेईल. उत्तर महाराष्ट्रात पूर्वमाेसमी पावसाच्या सरी काेसळणार असल्याने पुढील आठवड्यात पारा चाळिशीच्या खाली उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?

वेळ – अंश
११ वाजेला – ३५ अंश
१२ वाजेला – ३७ अंश
१ वाजेला- ३८ अंशापुढे
२ वाजेला – ४०अंश
३ वाजेला – ४१ अंशापुढे
४ वाजेला – ४१ अंश
५ वाजेला – ४१ अंश
६ वाजेला – ४१ अंश
७ वाजेला – ३९ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३७ तर रात्री ९ वाजेला ३६ अंशावर स्थिरावणार.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now