गुन्हेजळगाव शहर

मोठी कारवाई : काळ्याबाजारात जाणारे रेशनचे १०५ क्विंटल धान्य पकडले!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२२ । शासकिय स्वस्त धान्य दुकानातील तब्ब्ल १०५ क्विंटल धान्य गोण्यांमध्ये भरून अवैधरित्या काळ्याबाजारात विक्री साठी घेऊन जाणारे ट्रक पकडण्यात आले आहे. ही कारवाई जळगाव महसूल पथकांनी केली, यात ट्रकसह एकूण २ लाख ४७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी शहर पोलिसांत नोंद करण्यात आली.

शिवाजी नगरातील दूध फेडरेशनजवळील राजमालती नगरातील मेहमूद बिसमिल्ला पटेल (रा.राजमालती नगर) यांच्या घरातून रेशनचा माल अवैधरित्या व परस्पर काळ्याबाजारात जात असल्याची माहिती दीपक गुप्ता यांनी तहसीलदार नामदेव पाटील यांना कळविली होती. त्यानुसार नामदेव पाटील यांनी सोमवारी ६ जून रोजी सायंकाळी पुरवठा तपासणी अधिकारी डिगंबर भिकन जाधव यांच्यासह पथक घटनास्थळी रवाना केले होते. या पथकाने केलेल्या चौकशी सदरचे धान्य रेशनचे असल्याचे निष्पन्न झाले, मात्र त्याच्याजवळ कोणत्याच पावत्या नव्हत्या. अखेर तहसीलदार यांच्या पथकाने २२ हजार ५०० रुपये किमतीचा १५ क्विंटल गहू व २ लाख २५ हजार किमतीचा ९० क्विंटल तांदूळ, १ हजार रुपये किमतीच्या धान्याच्या गोण्या असा एकूण २ लाख ४८ हजार ५०० रुपये किमतीचा साठा व मालवाहू वाहने (एमएच ०६ एक्यू२१२४) आणि  (एमएच १९ सीवाय ६०६७) जप्त करण्यात आली आहेत. पुरवठा तपासणी अधिकारी डिगंबर भिकन जाधव (रा.रायसोनी नगर) यांच्या फिर्यादीवरुन मेहमूद पटेल यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी करीत आहे.

Related Articles

Back to top button