रेल्वे प्रवासात चक्क दिड लाखांचा ऐवज असलेली बॅग लांबवली!

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२२ । अजमेर ते रायपूर प्रवास करणार्‍या प्रवाशाची सुमारे दिड लाखांचा ऐवज असलेली बॅग भामट्यांनी लांबवल्याची घडण शुक्रवारी घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

रायपूर येथील रहिवासी दुशान सिंग राजपूत सिंग (39) हे शुक्रवार, 11 रोजी ट्रेन क्रमांक 20824 अजमेर-पुरी एक्सप्रेसच्या कोच क्रमांक बी- 4 च्या बर्थ क्रमांक 54 वरून प्रवास करीत असताना अमळनेर रेल्वे स्थानक येण्यापूर्वी अज्ञातांनी ब्ल्यू रंगाची रीबोक लिहिलेली हँडबॅग लांबवली.

त्यात एक लाख पंचवीस हजारांचे 12 जोडी कपडे व 20 हजारांची रोकड होती. या प्रकरणी भुसावल रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आल्यानंतर तो नंदुरबार रेल्वे पोलिसात वर्ग करण्यात आला.