तू खाऊन खाऊन मोटी झाली, कामधंदा करत जा म्हणत विवाहितेचा छळ; भुसावळातील घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२२ । प्लाॅट घेण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये आणावे. तू खाऊन खाऊन मोटी झाली आहे, कामधंदा करत जा, असे हिणवत विवाहितेचा छळ झाला. शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी पती, सासू, सासऱ्यासह आठ जणांविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार भुसावळ बाजापेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

crime 2022 06 06T112343.264 jpg webp

सध्या शहरातील पापा नगरात वास्तव्यास असलेल्या सना काैसर सलमान खान (रा.शिवाजीनगर, जळगाव) या विवाहितेचा माहेरहून प्लॉट घेण्यासाठी १० लाख रुपये आणावे या कारणावरून शारीरिक व मानसिक छळ, शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. या विवाहितेने बाजारपेठ पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळीविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. त्यात २० मे २०२० ते १५ मे २०२१ या काळात छळ झाल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी पती सलमान मेहमूद खान, सासू नाैशाबी महेमूद, सासरे मेहमूद खान, जेठ मजहर खान, जेठाणी मलिकीबी मजहर खान (रा. तवक्कल किराणा दुकानाजवळ, जळगाव), नणंद नसीमबी खान, नंदाेई हनिफ खान (रा.एरंडाेल), गनी (पूर्ण नाव माहीत नाही, रा.शिर्डी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now