जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२२ । २४ वर्षीय तरुणाने झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
फापाेरे येथील अविनाश रमेश पवार (वय २४) या तरुणाने स्वतःच्या शेतातील चिंचेच्या झाडास सुती दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी सचिन जाधव यांच्या माहितीवरुन अमळनेर पोलिसांत नोंद केली अाहे. तपास कॉन्स्टेबल कैलास शिंदे करत आहेत.