पाय घसरून नदी पात्रात पडल्याने मजुराचा मृत्यू

जून 2, 2022 6:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२२ । पाय घसरून बहुळा नदी पात्रात पडल्याने ४२ वर्षीय मजुराचा मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी घडलीय. शंकर मोहन गोपाळ (वय – ४२, रा. सावखेडा. ता पाचोरा) असे मृत मजुरांचे नाव असून याबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

savkheda news jpg webp

काय आहे घटना?
सावखेडा येथील रहिवाशी शंकर गोपाळ हे आज सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास मजुरीसाठी जात असतांना येथील बहुळा नदी पात्रात नजीक शंकर गोपाळ यांचा पाय घसरून ते पाण्यात पडले.

ही घटना एका लहान मुलाने ग्रामस्थांना कळविल्यानंतर ग्रामस्थांनी शंकर गोपाळ यास बाहेर काढून तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत शंकर मोहन गोपाळ यांचे पाश्चात्य वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, एक भाऊ असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now