शिवाजीनगरात शिवसेनेच्या शाखा फलकाला फासला गारा, परिसरात तणाव

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२२ । छत्रपती शिवाजी नगर परिसरामध्ये असणाऱ्या शिवसेनेच्या शाखेच्या बोर्डाला काही समाजकंटकांनी चिखल लावला. आजूबाजूचे वातावरण तणावाचे झाले होते. मात्र याबाबत पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीमुळे आता वातावरण नियंत्रणात आहे.

SHIVAJI NAGAR

जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरामध्ये बुधवारी दुपारी काही समाजकंटकांनी शिवसेनेच्या शाखेच्या बोर्डाला चिखल लावला. हे लक्षात येताच शिवसैनिकांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली मात्र आजूबाजूचे वातावरण तणावपूर्ण झाल्याचे पोलिसांना लक्षात येताच पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण शांत केले.

छत्रपती शिवाजी नगर शिवसेना विभागामधील शाखा क्रमांक सात शिवाजी नगर घरकुल शिव मंदिराजवळ शाखेच्या फलकाचे काही समाज कठकांनी चिखल लावून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी घटना लक्षात येताच विभाग प्रमुख विजय बांदल यांना शाखाप्रमुख गणेश सोनवणे, शाखा संघटकविनोद वारे, दीपक चौधरी, अंबादास निकुंभ काही लोकांनी फोनवर विभाग प्रमुख विजय बांदल यांना माहिती दिली. विभाग प्रमुख या नात्याने विजय बांदल घटनास्थळी पोहोचून त्वरित शहर पोलीस स्टेशनला फोन करून वातावरण दूषित होऊ नये म्हणून फोन करून कळवले शहर पोलीस स्टेशनच्या काही कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन वातावरण शांत राहावे व दोषींवर कडक कारवाई करू असे आश्वासन शिवाजीनगर शिवसेना विभाग प्रमुख विजय बांदल यांना देऊन बाल्टी भर पाणी घेऊन पोलीस कॉन्स्टेबल गोपीने विभाग नरेंद्र ठाकरे व योगेश पाटील यांनी स्वतः बोर्ड धुऊन काढला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now