जामनेर पोलीसांकडून लाखो रुपयांचा गुटखा, सुगंधीत सुपारी, जर्दा जप्त
जामनेर /प्रतिनिधी – जामनेर पोलीसांकडून अवैध प्रकारे वाहतूक होणाऱ्या गुटखा, सुगंधीत सुपारी, जर्दा या मालासह वाहुन नेण्यासाठी वापरण्यात येणारे वाहन ताब्यात घेण्यात आले.
सविस्तर व्रुत्त असे असे की नेरी येथील जळगांव – औरंगाबाद रस्त्यावर टोलनाक्या जवळ सकाळच्या ०६ च्या सुमारास जामनेर पोलीस स्टेशन चे पो. नि. किरण शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार जळगांव हून औरंगाबाद जाणारे संशयास्पद वाहन येत असल्याची माहिती मिळाली. क्षणाचा विलंब न करता नेरी येथील टोलनाक्याजवळ पोलीस ठाण्यातील पोलीस हेड. कॉ. रमेश कुमावत, पो. शाम गोविंद काळे, पो. कॉ. निलेश घुगे, यांनी तत्पर नेरी येथे जाऊन असता मिळालेल्या माहितीनुसार वाहनाची तपासणी करण्यात आली.
अशोक लेलँड कंपनीचे वाहन क्र. एम. एच. २०.ई.एल. ७५५२ या वाहनात पिंक व पांढऱ्या रंगाच्या ५, ८,२६ प्रमाणे भरलेल्या गोण्या आढळून आल्या. ४८ रुपये किंमतीच्या २६ जाफरानी जर्दा व १५ बोरे सुगंधीत पान मसाला, यामध्ये संशयित ५९९०४० व ८००००० एकुण १५४८८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संशयित आरोपी सोहेल जफर शेख वय (२१)रा इंदिरा नगर, बायजीपुरा, औरंगाबाद व सचिन शंकर बनकर वय(२६)रा बालाजी नगर औरंगाबाद या दोन्ही तरूणांना ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास जामनेर पोलीस करीत आहे.