अरेरे… पोटच्या गोळ्याला आईने दिले सोडून : केले बेवारस

जुलै 1, 2022 7:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२२ । शहरातील गणेश कॉलनीतील युनिटी चेंबर परिसरात तीन दिवसांपुर्वी एका आईने आपल्या पोटच्या गोळ्याला सोडून गेल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. त्या चिमुकल्याला पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर त्याला पोलिसांनी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
शहरातील गणेश कॉलनी परिसरातील युनिटी चेंबर परिसरात तीन वर्षाचा चिमुकला बेवारसरित्या ङ्गिरत होता. तीन दिवसांपासून हा चिमुकला याच ठिकाणी ङ्गिरत असून तो रात्री एका झाडाखाली झोपत असल्याचे व्यापारी संकुलातील व्यापारी रावसाहेब पाटील, प्रसाद कासार, विक्की महाले यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या चिमुकल्याची अस्थेवाईकपणे चौकशी केली. तो चिमुकला आजारी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या चिमुकल्याला तात्काळ एका रुग्णालयात नेवून त्याच्यावर उपचार केले. त्याची विचारपूस केली असता तो आई आपल्याला याठिकाणी सोडून गेल्याचे तो चिमुकला त्यांना सांगू लागला.

anath jpg webp

चिमुकल्याला केले पोलिसांच्या स्वाधीन
चिमुकल्याला त्या तरुणांनी खावू पिवू घातल्यानंतर त्याला सोबत घेवून त्या तरुणांनी त्याला जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आले. याठिकाणी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांकडून देखील त्या चिमुकल्याची विचारपूस केली. यावेळी तो चिमुकला त्याचे नाव कृष्णा असे सांगत असून वडीलांचे नाव संतोष तर आईचे नाव कमला असे सांगत आहे.

पोलिसांकडून चिमुकल्याचा कुटुंबियांचा शोध
चिमुकल्यावर शासकीय रुग्णालयता उपचार केल्यानंतर पोलिस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याल चिमुकल्याला बालसुधारगृहात दाखल केले आहे. दरम्यान, पोलिस त्या चिमुकल्याच्या कुटुंबियांचा शोध घेत असून त्या चिमुकल्याच्या कुटुंबांची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now