जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२२ । जळगाव जिल्ह्यातील दुचाकी चोरीचे प्रमाण काही केल्या कमी होत नसून दररोज कुठे ना कुठे दुचाकी चोरीची घटना घडत आहे. अमळनेर, भुसावळ बाजारपेठ, फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी केल्या प्रकरणी दि.३१ मे रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
अमळनेर येथील शिक्षक संतोष कृष्णा पाटील हे प्रताप मिल कंपाउंडमध्ये राहतात. दि.२९ रोजी रात्री १० वाजता त्यांनी स्वतःच्या मालकीची दुचाकी क्रमांक एमएच.१९.सीजी. ५९८८ ही विठ्ठल रुख्मिणीमंदिराजवळील मुतारी बाहेर लावली होती. रात्री ११ वाजता ते परत आले असता त्यांना दुचाकी आढळून आली नाही. याप्रकरणी त्यांनी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार चंद्रकांत पाटील करीत आहे.
भुसावळ येथील सुप्रसिद्ध डॉक्टर तुकाराम परशुराम मानवतकर यांनी स्वतःची दुचाकी क्रमांक एमएच.१९.सीपी.८८७६ ही दत्त नगरातील हॉस्पिटलबाहेर लावली होती. दि.१३ मे रोजी सकाळी १० ते दि.१४ मे रोजी रात्री ८ वाजेदरम्यान चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली आहे. डॉ.मानवतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार राजेश पाटील करीत आहे.
यावल येथील श्रीकृष्ण नगरात राहणारे शरद नारायण चौधरी हे कामानिमित्त फैजपूर येथे दि.३० मे रोजी आले होते. चौधरी यांनी स्वतःची दुचाकी क्रमांक एमएच.१९.डीबी.६९३० ही फैजपूर भुसावळ रस्त्यावर असलेल्या हॉटेल शिव मल्हार समोर लावली होती. सकाळी ६.३० ते ७.५० दरम्यान चोरट्यांनी त्यांची दुचाकी लंपास केली. याप्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक विशाल मोहे करीत आहे. पोलिसांकडून दुचाकी चोर नेहमी अटक केले जात असले तरी दुचाकी चोरीचे प्रमाण कमी होत नाही.