Avinash Bhosale : डीएचएफएल घोटाळा प्रकरणी अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक,

Avinash Bhosale jpg webp

मुंबई : पुण्याचेसुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना डीएचएफएल घोटाळा प्रकरणी सीबीआयकडून अटक करण्यात आलं आहे. विविध प्रकरणात आधीही अविनाश भोसले यांची चौकशी करण्यात आली होती. आज अखेर त्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण

मूळ प्रकरण 2018 सालातील आहे. त्यावर्षी एप्रिल ते जूनच्या काळात हजारो कोटी रुपये एका खआत्यातून दुसऱ्या खात्यात वळवण्यात आले होते. त्यात मोठ्या उद्योजकांच्या कंपन्यांचा सहभाग होता. यात अविनाश भोसले, संजय छाब्रिया, बलवा व गोएंका यांचा समावेश होता. या प्रकरणी एप्रिलच्या अखेरीस सीबीआने छापेमारीही केली होती. या प्रकरणाने सध्या राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. कारण अविनाश भोसले यांचे राजकीय संबंध असल्याचे बोलले जाते.

येस बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राणा कपूर यांनी डीएचएफएलमध्ये 3700 कोटी रुपये कर्जऱोख्यांतून गुंतवले होते. यात राणा यांना 600 कोटींची दलाली मिळाल्याचे समोर आले होते. त्यानंतर डीएचएफएलने हे पैसे छाब्रिया यांच्या रेडियस ग्रुप, भोसले यांच्या इन्फ्रा लिमिटेड आणि बलवा आणि गोएंकाच्या कंपनीत वळते केले होते. त्यानंतर छाब्रियांना अटक करताच भोसले, बलवा आणि गोएंका यांच्यावर सीबीआयने छापेमारी केली होती. डीएचएफएल म्हणजेच दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने येस बँकेकडून 750 कोटींचे कर्ज घेतले होते. पण त्याचा वापरच करण्यात आला नाही, असे तपासात समोर आले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now