---Advertisement---
गुन्हे मुक्ताईनगर

Accident : कारच्या धडकेत वारकरी जागीच ठार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२२ । भरधाव वेगाने धावणार्‍या चारचाकीने दिलेल्या धडकेत वारकरी ठार झाल्याची दुःखद घटना मुक्ताईनगरात घडली. या प्रकरणी येथील पोलिसांत नोंद करण्यात आली.

शेगाव तालुक्यातील नारायण श्रीपत शेळके (वय ६७) हे आज संत मुक्ताई तिरोभूत सोहळ्यासाठी आले होते. ते नव्या मुक्ताईवरून जुन्या मुक्ताई मंदिराकडे जात असतांना महामार्ग क्रॉस करतांना भरधाव वेगाने धावणार्‍या मारूती सुझुकीसारख्या दिसणार्‍या कारने त्यांना धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला.

या संदर्भात सागर हरीभाऊ पाटील ( वय २७, रा. सुळे, ता. मुक्ताईनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक परवीन तडवी, हवालदार मोहंमद तडवी आणि कॉन्स्टेबल गजमल पाटील हे करीत आहेत. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक फलक नसल्यामुळे बर्‍याच भाविकांना नेमका रस्ता समजत नाही. यातूनच हा अपघात घडल्याचे दिसून येत आहे. यामुळे येथे तातडीने दिशादर्शक फलक लावण्याची मागणी होत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---