राजा शिवछत्रपती परिवारातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२२ । राजा शिवछत्रपती परिवारतर्फे दि. 29 मे रविवार रोजी सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत रक्तपेढी जिल्हा रुग्णालय जळगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. असून जास्त शिवप्रेमी मावळ्यांनी रक्तदान करावे असे आवाहन जळगाव विभाग प्रमुख व रक्तपेढीने केले आहे.
उन्हाळ्यात रक्तदानाचे प्रमाण दरवर्षीच कमी असते. त्यामुळे साहजिकच उन्हाळ्यात रक्त पिशव्यांचा तुटवडा भासतो असून जिल्हा रुग्णालयासारख्या ठिकाणी रुग्णांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. आता सुद्धा जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत अत्यल्प साठा आहे. येणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकाला समाधानी करण्याचा येथील कर्मचाऱ्यांचा प्रयत्न असतो. परंतु. अद्याप तरी रक्ताला रक्तदानाशिवाय कोणताही अन्य पर्याय नसल्याने कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक अश्या प्रसंगी हतबल असतात. त्यामुळे राजा शिवछत्रपती परिवारातर्फे या रक्तदानाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त शिव मावळ्यांनी रक्तदान करावे असे आवाहन संस्थेतफे करण्यात आले आहे.