Murder in Jalgaon : जळगाव पुन्हा हादरले, दगडाने ठेचून तरुणाची हत्या, दोघे ताब्यात

मे 25, 2022 11:28 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२२ । जळगावात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसतेय. खून, चोरी, घरफोड्या यासारख्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढताना दिसतेय. अशातच आता शहरात पुन्हा एका तरुणाच्या खुनाची घटना समोर आलीय. शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळ रात्री उशीरा एका तरूणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. अनिकेत गणेश गायकवाड (रा. राजमालती नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव असल्याचे समोर आले असून या घटनेने शहरात प्रचंड खळबळ उडालेली आहे

jalgaon murder 1 jpg webp

काय आहे नेमकी घटना?
जळगाव शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळ असलेल्या मालधक्क्याच्या समोर रात्री उशीरा एका तरूणाची दगडाने ठेचून हत्या झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तपास करून संबंधीत तरूणाची ओळख पटविली. यातून मयत हा तरूण अनिकेत गणेश गायकवाड (रा. राजमालती नगर, जळगाव) असल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, खून झालेल्या ठिकाणापासून काही अंतरावरच दारूच्या बाटल्या आढळून आल्यामुळे खून करण्यापूर्वी मयत अनिकेत गणेश गायकवाड याला मारेकर्‍यांनी दारू पाजून मग त्याच्या डोक्यात दगड टाकून त्याचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच खूनी हे मयत तरूणाच्या परिचयातील असल्याचेही निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू असल्याचे समजते. याबाबत शहर पोलीस स्थानकात अज्ञात मारेकर्‍यांच्या विरोधात भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now