⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | रोहयो सेवकाकडून मागितली लाच, ग्रामसेवकासह सरपंच महिलेचा पती रंगेहात

रोहयो सेवकाकडून मागितली लाच, ग्रामसेवकासह सरपंच महिलेचा पती रंगेहात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२२ । रोहयो सेवकाकडून मानधनाच्या धनादेशावरती सही करून देण्याच्या मोबदल्यास ४ हजार रुपयाची लाच घेताना ग्रामसेवकासह सरपंच महिलेच्या पतीला एसीबीने रंगेहात अटक केली आहे.पाचोरा वरसाडे प्र.पा.येथे ही घटना घडली असून काशिनाथ राजधर सोनवणे (वय-52) असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे तर शिवदास भुरा राठोड वय ६७ असे वरसाडे प्र.पा.ग्रामपंचायतीचे महिला सरपंचच्या पतीचे नाव आहेत. या कारवाईने खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकार?
तक्रारदार हे ग्रामपंचायत वरसाडे प्र.पा. अंतर्गत होणाऱ्या रोजगार हमी योजने अंतर्गत कामांसाठी मानधन तत्वावर रोजगार सेवक म्हणून काम केले आहे. त्यांचे मिळणारे मानधनाच्या धनादेशावरती सही करून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे ग्रामसेवक काशिनाथ राजधर सोनवणे यांच्यासह शिवदास भुरा राठोड यांनी प्रथम पंचासमक्ष 6 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 4 हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार सदर रक्कम वरसाडे प्र.पा.ग्रामपंचायतीचे महिला सरपंच पती यांच्याकडे देण्यास सांगितले

याबाबत तक्रारदार यांनी ॲन्टी करप्शन ब्युरो,जळगाव यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार सापळा रचून ग्रामसेवक यांच्या पंचासमक्ष महिला सरपंच पती यास वरसाडे प्र.पा. ग्रामपंचायत कार्यालयातच 4,000 रुपयाची लाच स्वीकारताना अटक केली आहे.

यांनी केली कारवाई
DYSP शशिकांत एस.पाटील, PI संजोग बच्छाव, PI.एन.एन.जाधव स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ यांनी ही कारवाई केली

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.