Crime : चिडविल्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी ; दोन फिर्यादी दाखल

crime 76 jpg webp

जळगाव लाईव्ह न्युज | २५ मे २०२२ | पारलेजी नावाने चिडविल्याच्या कारणावरून जळगाव तालुक्यात दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी परस्परविरोधात नशिराबाद पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथे समीर दादामिया पटेल हा तरूण २२ मे रोजी सायंकाळी ५ वाजता गावातील राममंदीर चौकातून भावा सोबत बाजारात जात होता. त्यावेळी गावातील गणेश राजेंद्र काटे, भुषण पुंडलिक कोळी, रितेश जगन कोळी, मोहित दिलीप कोळी सर्व रा. भादली बुद्रुक ता. जि.जळगाव यांनी समिरच्या चुलत भावाला पारलेजी म्हणून चिडविले. याचा जाब विचारला असता चौघांनी दोघांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी समीर पटेल यांच्या फिर्यादीवरून गणेश राजेंद्र काटे, भुषण पुंडलिक कोळी, रितेश जगन कोळी, मोहित दिलीप कोळी यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

तर भुषण पुंडलिक कोळी हा गावातील राममंदीराजवळून बाजारात जात असतांना पारलेजी चिडविल्याच्या कारणावरून समीर दादामिया पटेल, हुसेन बिस्मिल्ला पटेल, परवेज अनीस पटेल आणि अदनान जाकीर पिंजारी सर्व रा. भादली बुद्रुक ता.जि.जळगाव यांनी भुषण कोळी याला बेदम मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी भुषण कोळी यांच्या फिर्यादीवरून समीर दादामिया पटेल, हुसेन बिस्मिल्ला पटेल, परवेज अनीस पटेल आणि अदनान जाकीर पिंजारी यांच्या विरोधात नशिराबाद पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अलियार खान करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now