खळबळजनक! गुरांची अवैध वाहतूक बनला चिंतेचा विषय, हिंगणा परिसरात पुन्हा आढळले १० बैल मृतावस्थेत

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२२ । बोदवड तालुक्यात चालणारी गुरांची अवैध वाहतूक चिंतेचा विषय बनली आहे. त्यात मुक्ताईनगर ते हिंगणे फाटा दरम्यान वारंवार मृत गुरेढोरे सापडण्याचे प्रकार वाढत आहे. आताही हिंगणा फाटा भागात महादेव मंदिर परिसराच्या काही अंतरावर १० बैल मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली.

crime 81 jpg webp

प्रशासन दुर्लक्ष मुक्ताईनगर चेक पोस्टवरून पशुधनाची अवैध वाहतूक करणारी वाहने दलालांच्या मध्यस्थीने सोडली जातात. पुढे मुक्ताईनगर ते हिंगणा फाटा दरम्यान जंगल येते. दरम्यान, रात्री राष्ट्रीय महामार्ग सुमारास सामसूम असतो. याचा गैरफायदा घेत राजस्थान, मध्य प्रदेश येथून लांब पल्ला गाठताना प्रवासात मृत झालेली जनावरे या जंगलात फेकून दिली जातात. मुक्ताईनगर ते बोदवड दरम्यान अनेकदा असे प्रकार उघड झालेले आहेत. पोलिस प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now