जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२२ । बोदवड तालुक्यातील नांदगाव येथील ग्रामरोजगार सेवक गौतम बाबुराव निकम यांना पदावरून कमी करण्याचे आदेश, २० रोजी प्रभारी गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे बोदवड यांनी नांदगाव येथील ग्रामसेवक व सरपंच यांना दिले आहेत.
निमखेड शिवारातील गट क्रमांक १६३ मध्ये बाबुराव निकम व नांदगाव येथील ग्राम रोजगार सेवक गौतम निकम यांनी एकाच शेतात दोन विहिरींचे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुदान घेतले होते. परंतु एकाच विहिरीचे खोदकाम व बांधकाम केले होते. दुसऱ्या विहिरीचे अंदाजित अनुदान १ लाख ३४ लाटून भ्रष्टाचार केला होता. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष अर्जुन आसने यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.