अजब प्रकार : वाहनातील बॅटरीसह २० लिटर डिझेलची झाली चोरी

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२२ । जिल्हातील शेळगाव बॅरेज या प्रकल्पाचे काम सुरु आहे. यावेळी कामाच्या ठिकाणहुन चोरट्यांनी बॅटरीसह २० लीटर डिझेल चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

crime 82

शेळगाव बॅरेज प्रकल्पावर प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून रत्न किशोर चंदलवाड (वय- ५१) हे काम करतात. त्यांनी प्रकल्पावरील कामासाठी भाडेकरारावर ट्राला लावला आहे. १७ मे रोजी सी.जी.०७ सी.ए.६६८८ या क्रमाकांच्या ट्रालामधून १० हजार रुपये किंमतीची बॅटरी व २० लिटर डिझेल चोरट्यांनी चोरुन नेले. सकाळी हा प्रकार समोर आला. याबाबत प्रोजेक्ट मॅनेजर रत्न किशोर चंदलवाड यांनी याठिकाणच्या कामगारांसह इतरांना विचारणा केली.

बॅटरी व डिझेलबाबत कुठलीही माहित न मिळाल्याने रत्न किशोर चंदलवाड यांनी शनिवारी नशीराबाद पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अलीयार खान हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now