प्रेम संबंधातून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गुन्हा नोंद

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२२ । अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेवून शारिरीक अत्याचार करून तिला धमकावल्याप्रकरणी दोन जणांविरूध्द अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

crime 75 jpg webp

अमळनेर शहरातील एका भागात १७ वर्षीय मुलीचा विवाह ठरला आहे. ती अठरा वर्षाची असताना तिचा विवाह करण्याचे नियोजन करण्यात आले होते. या दरम्यान, संबंधीत तरूणीने गांधीलपुरा भागातल्या मेहतर कॉलनीतील कुणाल उर्फ आण्णा देवा घोगले याने धमकी देवून अत्याचार केल्याची माहिती आपल्या कुटुंबाला दिली. त्याला रवी उर्फ रघूभाई घोगले मदत करायचा. तर तसेच नेहमी धमकी द्यायचा असेही तिने सांगितले. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रवी घोगले याने आपण तुझ्या घरातील लोकांना मारून टाकेल, अशी धमकी दिली, अशीही तक्रार पोलिसात करण्यात आली आहे. या अनुषंगाने याबाबत पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून कुणाल उर्फ आण्णा देवा घोगले आणि रवी उर्फ रघूभाई घोगले या दोघांविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now