जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । अमळनेर येथील संत सखाराम महाराजांची यात्रा कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून खंडांनंतर यंदा बोरा पात्रात मोठ्या प्रमाणात भरल्याने दररोज भाविकांची प्रचंड गर्दी उसळत आहे. यामुळे यात्रेतील व्यावसायिक चांगलेच सुखावले असून दररोज लाखो रूपयांची उलाढाल होत आहे.
भाविकांची गर्दी असल्याने अक्षरशः दोन्ही पुलाकडे आपली वाहने पार्किंग करावी लागत आहे. तसेच मोठे पाळणे ‘झुले मौत का कुवा’ यासह इतर शोसाठी बराच वेळ वाट पाहावी लागत आहे. खाद्यपदार्थांची दुकाने कोल्ड्रिंक्स थंडपेय दुकाने व मीना बजार देखील हाउसफुल असून संसार उपयोगी वस्तू खरेदीसाठी देखील महिलांची गर्दी होत आहे. अनेक जण घरून डबे आणून नदीपात्रात सहकुटुंब न्याहारी आनंद घेत आहेत. सोबत जिलेबी व भजी आणि चिवड्यावर देखील ताव मारत आहेत. विशेष करून सर्वाधिक धम्माल बच्चे कंपनीची असून पाळणे असो की, इतर खेळणे प्रत्येक ठिकाणी बालकांची मौज मस्ती निदर्शनास येत आहे. काही बालके दररोज यात्रेत जाण्याचा आग्रह पालकांकडे धरीत असून पालक देखील मुलांचा हट्ट आनंदाने पुरवीत आहेत. रात्री उशिरापर्यंत यात्रोत्सवाची धामधूम सुरू राहत आहे. उत्तम नियोजन आणि पुरेसा पोलीस बंदोबस्त यामुळे यात्रोत्सव शांततेत या गर्दीमुळे साऱ्यांच व्यवसाईक पाळणे खेळण्यांची दुकानदारांचा उत्तम व्यवसाय होत असल्याने दोन वर्षांची कसर या यात्रेने काढल्याचे दिसू लागले आहे.