अयोध्या दौऱ्याबाबत राज ठाकरेंची मोठी घोषणा
जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बहुचर्चित अयोध्या दौरा राज ठाकरे यांनी रद्द केला आहे. मात्र याचा कारण अजून अस्पष्ट आहे. त्यांची तब्येत खराब असल्याने हा दौरा रद्द करण्यात आला आहे अशी चर्चा आहे
मात्र त्यांना उत्तर प्रदेशात झालेला विरोध हेही एक कारण आहे असे म्हटले जात आहे. यातच शिवसेना नेते माजी खा. संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना टोमणा लगावला आहे. यावेळी ते म्हणले कि, “अयोध्या दौऱ्यासाठी त्यांनी मदत मागितली असती, तर आम्ही सहकार्य केलं असतं”,
यावर आता मनसेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. राज ठाकरेंनी केलेल्या तूर्तास अयोध्या दौरा स्थगित या ट्वीटनंतर त्यावरून सुरू झालेल्या तर्क-वितर्कांवर हे उत्तर देण्यात आलं आहे.
“तूर्तास अयोध्या दौरा स्थगित! महाराष्ट्र सैनिकांनो, या! यावर सविस्तर बोलू” असं म्हणत २२ मे रोजी पुण्यात होणाऱ्या सभेमध्ये यासंदर्भात भूमिका मांडणार असल्याचं राज ठाकरेंनी या ट्वीटमध्ये स्पष्ट केलं आहे. या