⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

उद्धव ठाकरे संतापले, म्हणाले.. ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा, भाजप आणि शिंदेंवर टीका

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२२ । राज्यातील राजकीय घडामोडींवर गेल्या चार दिवसापासून शांत आणि संयमी भूमिका ठेवून असलेले मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच संतापले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर हल्लाबोल केला असून बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर त्यांनी जोरात तोंडसुख घेतले आहे. उद्धव ठाकरे यांनी आज खुले आव्हानच केले असून ठाकरे थेट मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. बंडखोरांना ठाकरे यांनी इशारा दिला असून एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना काय कमी केले असे ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्री पद आणि सत्तेचा लोभ नसून मी राजीनामा देण्यास तयार असल्याचा पुनरुल्लेख त्यांनी केला आहे. (CM Uddhav Thackeray on Eknath Shinde )

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह येत जनतेशी संवाद साधला होता. मला माझ्या लोकांनी सांगितले असते की, तुम्ही मला मुख्यमंत्री म्हणून नको, तुम्ही नालायक आहेत तर मी या क्षणाला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईन. अशी भावनिक साध उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना घातली. याच बरोबर ते शिवसैनिकांना देखील भावनिक साद घालत म्हणाले कि, जर तुम्हाला पक्षप्रमुख नको असे वाटत असेल तर स्पष्टपणे सांगा मी त्याचाही राजीनामा देतो, असेही ते म्हणाले होते. दोन दिवस होऊन देखील बंडखोर घरवापसी करीत नसल्याने उद्धव ठाकरे यांनी वेगळी रणनीती हाती घेतली आहे. पक्ष संघटन आणि माविआच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी लढा देण्यास सुरुवात केली आहे.

आज साधलेल्या संवादात उद्धव ठाकरे म्हणाले कि, मी जिद्द सोडलेली नाही, माझी जिद्द आज देखील कायम आहे. मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता कि या पदावर जाईल. सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झाला तर मला आनंद होईल. माझे मुख्यमंत्री पद देखील घ्या असे मी फेसबुक लाईव्हमध्ये म्हणालो होतो. मुख्यमंत्री पद माझ्यासाठी गौण आहे. माझी लायकी नसेल तर मी ते पद सोडायला तयार आहे. मला सत्तेचा लोभ नाही, वर्षा सोडून मी मातोश्रीवर आलो. आज शिवसेनेच्या स्थापनेसारखीच स्थिती असल्याचे समजा असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले. माझे मुख्यमंत्रीपद नाकारणे म्हणजे राजकीय राक्षसी प्रवृत्ती आहे. जे सोडून गेले त्याचे मला वाईट का वाटावे. मेलो तरी सेना सोडणार नाही म्हणणारे पळून गेले. झाडाची फुले न्या, फांद्या न्या, मूळ मात्र नेता येणार नाही. कोण कसे वागले त्यात आपल्याला जायचे नाही, असे ते म्हणाले.
हेही वाचा : Big Breaking : शिवसेनेकडून ‘तो’ प्रस्ताव म्हणजे रडीचा डाव : एकनाथ शिंदे

ठाकरे पुढे म्हणाले कि, कोरोनामुळे डोळ्यात पाणी आले ते अश्रू नव्हते. बंडखोरांनी माझा फोटो न वापरता जनतेत वावरून दाखवा. कुटुंबप्रमुखांना धोका दिला याचे वाईट वाटते. बंडखोरांकडून शिवसेना फोडण्याचे पाप करण्यात आले आहे. सीएम पदाची खुर्ची हलत होती पण ते माझं मानेचे दुखणे होते. मानेचे दुखणे वाढले आणि हात, पाय काम करीत नव्हते. एकनाथ शिंदे यांना काय कमी केले. नगरविकास खाते दिले. माझ्याकडील दोन खाती दिली. संजय राठोड यांच्यावर वाईट आरोप होऊन देखील मी त्यांना सांभाळले. बाहेरच्या भाडोत्री लोकांकडून आपल्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. भाजपने हा डाव साधला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

आज सेनेच्या अस्तित्वावर बोलणाऱ्यांना निष्ठा काय असते हे दाखवावे लागेल. आपलेच काही लोक घेऊन सेनेवर सोडण्यात आले आहे. मला वीट आलाय म्हणून मी वीट हाणणारच, ठेवून काय करणार, असा आक्रमक पवित्र उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केला. तसेच विठ्ठल बडव्यांवर जे बोलताय त्यांचा मुलगा खासदार आहे. सर्व कारस्थान भाजपने केले आहे, त्यांची आग्राहून सुटका करावीच लागेल. तुम्हाला जर भविष्य दिसत असेल तर खुशाल जा. बाळासाहेबांचे माझ्यापेक्षा लाडके अपत्य म्हणजे शिवसेना आहे. आदित्यला सांगितले आहे काहीही होणार नाही. आमदारांना फूस लावून मी सत्तानाट्य का घडवेल, असा सवाल करीत बंडखोर आमदारांना काय कमी केले असे ते म्हणाले. मी बरा होऊन नये म्हणून काहींनी देव पाण्यात बुडविले होते, असा आरोप देखील उद्धव ठाकरे यांनी केला आहे.