… तरच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊ; अमित ठाकरेंचे मोठे विधान

जुलै 23, 2022 6:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२२ । महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपचे नवे सरकार स्थापन झालं आहे. सरकार स्थापन होऊन तीन आठवडे उलटले असले तरी अद्यापही या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाहीय. त्यात कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता देखील लागून आहे. मात्र शिंदे सरकारमध्ये राज ठाकरेंच्या मनसेला मंत्रिपद मिळू शकते अशा चर्चा काही दिवसांपासून सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी एक मोठं विधान केलं आहे. गृहमंत्रीपद देणार असतील तर सत्तेत सहभागी होऊ असं विधान अमित ठाकरेंनी केलं.

amit thakre shinde fadanvis jpg webp

अंबरनाथ इथल्या प्राचीन शिवमंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मंत्रिपदांच्या चर्चेबद्दल विचारण्यात आलं असता त्यावर उत्तर देताना गृहमंत्रीपद देणार असतील तर सत्तेत सहभागी होऊ. पण ते देत नाहीये अशी मिश्किल टिप्पणी अमित ठाकरे यांनी केली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसे मध्ये जवळीक वाढली आहे. राज ठाकरेंनी आपल्या जाहीर सभांमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर जोरदार टीका केली मात्र भाजपबद्दल त्यांनी एक शब्दही काढला नव्हता. तसेच नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत देखील आपलं मत भाजप उमेदवाराच्या पारड्यात टाकलं होत. मागील आठवड्यात देवेंद्र फडणवीस यांनी थेट कृष्णकुंज वर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यामुळे शिंदे- फडणवीस सरकारमध्ये एकमेव आमदार असलेल्या मनसेला मंत्रिपद मिळणार अशा चर्चाना उधाण आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now