⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | जिल्ह्यात चोरटे झाले सैराट ; देवीच्या मंदिरातील दानपेटी, चांदीचा मुकुटसह छत्र लांबवले

जिल्ह्यात चोरटे झाले सैराट ; देवीच्या मंदिरातील दानपेटी, चांदीचा मुकुटसह छत्र लांबवले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२२ । जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढताना दिसतंय. चोरट्यांना पोलिसांचा धाकच राहिलेला नसल्याचे दिसून येतेय. कधी शेती साहित्याची चोरी तर कधी घरफोडीसारख्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहे. अशातच आता यावल तालुक्यातील फैजपूर-बामणोद रोडवरील एकवीरा माता मंदिरातील दानपेटी, चांदीचा मुकुट व चांदीचे छत्र अज्ञात चोरट्यांनी लांबवले.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

एकवीरा मातेच्या देवस्थानात १४ रोजी रात्री ९ ते १५ मे रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे स्टीलच्या गेटचे कुलूप तोडले. लाकडी दरवाजा जोरात आत ढकलून आत प्रवेश केला. यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यातून देवीचा चांदीचा मुकुट व चांदीचे छत्र, दानपेटी चोरून नेली. या सर्व मुद्देमालाची किंमत सुमारे ३१ हजार ४०० रूपये आहे.

दरम्यान, चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी आजूबाजूला शोध घेतला. त्यात रोडच्या पलीकडे असलेल्या कपाशीच्या शेताचे उत्तर बांधालगत मंदिरातील दानपेटी फोडलेली दिसली. मात्र, त्यातील रक्कम गायब होती. याबाबत रमेश सोनवणे यांच्या तक्रारीवरून फैजपूर पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार गोकुळ तायडे करत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.