जळगाव शहरात रंगला सैराट : प्रेमविवाह केला म्हणून तरूणासह नातेवाईकांना मारहाण

CRIME 17 jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२२ । जळगाव शहरातील एका जोडप्याने प्रेम विवाह केल्याने पत्नीच्या नातेवाईकांनी पतीसह त्याच्या नातेवाईंकांना मारहाण करून जखमी केले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी नातेवाईकांनी रिक्षाची तोडफोड देखील केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी कि, भावेश रमेश गोसावी (वय-२२) रा. लक्ष्मीनगर जळगाव हा आपल्या पत्नी जागृती व कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. भावेशने जागृतीशी प्रेमविवाह केला आहे. त्यामुळे जागृतीचे नातेवाईकांनी रागाच्या भरात १५ मे रोजी सकाळी ७ वाजता भावेश हा पत्नी व नातेवाईकांसोबत रिक्षाने जात असताना विशाल पेट्रोल पंपाजवळील नर्सरी समोर त्यांना मारहाण केली. यावेळी गजेंद्र घुगे-पाटील, निलेश राजेंद्र घुगे, दुर्गेश गजेंद्र घुगे, निखील राजेंद्र घुगे, तुषार राजेंद्र घुगे आणि जितेंद्र घुगे-पाटील यांच्यासह इतर २ ते ३ जण सर्व रा. लक्ष्मीनगर जळगाव यांनी रिक्षा आडवून भावेशसह त्याची आई व नातेवाईकांना बेदम मारहाण करून जखमी केले.व रिक्षेची तोड फोड केली. भावेशची पत्नी जागृती हिला बळजबरी घेवून गेले.

दरम्यान, याप्रकरण भावश गोसावी याने एमआयडीसी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now