जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२२ । शेख नाजीम शेख शरीफ यांच्या मालकीची MH19.BX.7990 या नंबरची हिरो स्प्लेंडर प्रो कंपनीची मोटर सायकल चोरट्यांनी लांबविली आहे. या संबंधी निंभोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक महिषी अशी कि, मुलगा शेख राहील शेख नाजीम हा दि.१३-५-२२ रोजी १:३० वा.मि सुमारास नेहमी प्रमाणे सुन्नी जामा मशिदीत नमाज पठण करण्याकरिता गेला होता. यावेळी हि मोटर सायकल मशिदीच्या जवळ असलेल्या पशू वैद्यकीय दवाखान्या समोर उभी केली होती. नमाज पठण करून दुपारी २:१५ वा. च्या सुमारास सुन्नी जामा मशिदीतून बाहेर आल. त्यावेळी हि मोटार सायकल तिथे नव्हती. मोटर सायकल न दिसल्याने आजू बाजूच्या परिसरातील लोकांना मोटर सायकल बाबत विचारपूस केली. यावेळी मोटार सायकल कोण घेवून गेले याबाबत कोणतीही माहिती न मिळाल्याने गावात शोधाशोध करुनही मोटर सायकल मिळून न आल्याने कोणीतरी अनोळखी इसमाने २०,००० रू किमतीची मोटर सायकल चोरून नेल्याची घटना घडली आहे.

याबाबत निंभोरा पोलिस स्टेशनला शेख नाजीम शेख शरीफ यांनी फिर्याद दिली. अनोळखी व्यक्ती विरोधात भादंवि कलम ३७९ या प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो कॉ रिजवान पिंजारी हे करीत आहे.











