आई जेवणाचा डब्बा घेऊन मुलीच्या घरी पोहोचली, दरवाजा उघडताच बसला धक्का !

मे 14, 2022 3:15 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२२ । सध्या आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतानाचे दिसून येत आहे. अशातच जळगाव (Jalgaon) शहरातील सत्यम पार्क येथे एका ३० वर्षीय विवाहितेने गळफास (Woment Succied) घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आलीय. कौटुंबिक जांचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. सुनिता शरद पाटील (वय-३०) रा. पिंपळकोठा ता. एरंडोल ह.मु. सत्यम पार्क, असे मृत विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, याबाबत जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

jalgaon woment succied jpg webp

काय आहे नेमकी घटना?
सुनिता पाटील व तिचे पती शरद मंगल पाटील यांच्यात गेल्या १० वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरु असल्याने त्या विभक्त राहत होत्या.त्यामुळे विवाहिता सुनिता पाटील ह्या खोटेनगरातील सत्यमपार्क येथे लहान मुलगा आयुष सोबत राहत होत्या. तर पती शरद पाटील हा त्याचे आईवडील आणि मोठा मुलगा वेदांत सोबत पिंपळकोठा येथे राहत आहे. दरम्यान, दोन दिवसापूर्वी मृत महिलेच्या घराला आग लागली होती त्यात संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या होत्या.

शहरातील त्रिभुवन कॉलनीत विवाहितेचे आईवडील राहतात. त्यांच्याकडे सुनिता पाटील यांचा लहान मुलगा आयुष देखील राहतो. त्यामुळे विवाहिता शुक्रवार १३ मे रोजी रात्री घरी एकट्याच होत्या. मध्यरात्री विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान, शनिवारी १४ मे रोजी सकाळी १० वाजता विवाहितेची आई बेबीबाई भाईदास पाटील ह्या मुलीला डबा देण्यासाठी तिच्या घरी सत्यमपार्क येथे आल्या असता मुलीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. मुलीचा मृतदेह पाहून त्यांनी टाहो फोडला.

विवाहितेने आत्महत्या केली नसून तिचा पती शरद पाटील यानेच तिला गळफास देवून खून केल्याचा आरोप मयत विवाहितेची आई बेबीबाई पाटील यांनी केला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now