⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | महाराष्ट्र | निवडणूकबाबत संभाजीराजेंनी केली ‘ही’ मोठी घोषणा

निवडणूकबाबत संभाजीराजेंनी केली ‘ही’ मोठी घोषणा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२२ । राज्यसभा खासदारकी संपुष्टात आल्यानंतर छत्रपती संभाजीराजे नेमकी कोणत्या मार्गाने आगामी वाटचाल करतील किंवा कोणत्या पक्षात जातील याबाबात चर्चा रंगल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी आज पत्रकार परिषद घेत नव्या संघटनेची स्थापना केली आहे. स्वराज्य संघटना असं त्यांच्या संघटनेचं नाव आहे. स्वराज्याच्या नावाखाली लोकांना संघटित करण्यासाठी आज मी स्वराज्य संघटनेची स्थापना करतो अशी घोषणा संभाजीराजे यांनी केली.

दोन निर्णय मी घेतले आहेत. पहिला राज्यसभेचा. येत्या जुलैमध्ये सहा जागा रिक्त होणार आहेत. यावर्षीची राज्यसभेची निवडणूक लढवणार, असल्याचे ते म्हणाले. तर ही निवडणूक मी अपक्ष म्हणून लढणार असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.

सर्वपक्षीयांनी मला पाठिंबा देऊन राज्यसभेत पाठवावे असं आवाहन संभाजीराजे यांनी केलं. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, मी अपक्ष निवडणूक लढवणार आहे. आजपासून मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही. असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं

या संघटनेच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणार असल्याचे म्हटले आहे. राज्यभर दौरा केल्यानंतर सर्व समाजबांधवांना काय वाटते, त्यांची भावना जाणून घेऊन पुढील वाटचाल करणार आहे. दरम्यान, पक्षाचे चिन्ह आणि रंग अद्याप ठरवला नाही, असे ते म्हणाले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.